नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असून राडा रोडा (डेब्रिज) कोठेही टाकला जात आहे. अशाच प्रकारे राडारोडा टाकणाऱ्या इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सिडको अधिकाऱ्याच्या गाडी समोर स्वतःची गाडी आडवी घालत धमकीही दिली.

हेही वाचा- नवी मुंबई : सायबर पोलीस ठाणी बासनात?

अलंकार ठाकूर असे यातील आरोपीचे नाव आहे.वैभव शास्त्रकार हे सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून सिडकोत काम करीत असून नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बेकायदा राडा रोडा टाकणाऱ्यांना रोखणे हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे. डिसेंबर २०२२ मध्ये हा विमानतळ परिसरात असलेल्या शंकर मंदिराच्या मागील भागात अलंकार ठाकूर नावाचा इसम राडा रोडा टाकत असल्याची माहिती मिळाली. वैभव हे तात्काळ घटनास्थळी पोहचत अलंकार ठाकूर याला सुरवातीला समज दिली. मात्र ही जागा स्वतःची असल्याचा दावा त्याने केला. वास्तविक या जागा सिडकोने अधिगृहित केलेल्या आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई पोलिसांनी जप्त केला ६१ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा; दोन टेम्पोही ताब्यात

मंगळवारीही असाच प्रकार घडल्याने वैभव यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ते कारवाईसाठी गेले असता अलंकार ठाकूर याने अरेरावीची भाषा केली. त्यामुळे त्याच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास जाणार आसल्याचे त्याला सांगताच त्याने स्वतःची गाडी आडवी घालत शिवीगाळ केली तसेच तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिली. त्यामुळे जीवितास धोका असलेला राडारोडा सेक्टर २६ येथे बेकायदा टाकणे, शिवीगाळ करणे धमकी देत वाहन आडवणे, सरकारी कर्मचाऱ्यांना प्रतिबंध करणे प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Story img Loader