पनवेल – पनवेल महापालिकेची विविध कंत्राटे मिळविणा-या एका कंत्राटदारावर पालिका प्रशासनाने सोमवारी पनवेल शहर  पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या कंत्राटदार कंपनीचे नाव श्रीनाथ इंजिनीयरींग कंपनी असे आहे. गोपालकृष्ण लड्डा या कंपनीचे मालक आहेत. लड्डा यांनी पालिकेची १ कोटी ३२ लाख ६३ हजार रुपयांची बनावट बॅंक  गॅरंटीची कागदपत्रे बनावट सादर करुन पालिकेची फसवणूक केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर येथे  लड्डा यांचीकंपनीची स्थापना झाली असून नोव्हेंबर २०२२ पासून सोमवारपर्यंत श्रीनाथ इंजिनियरींगकंपनीकडे पनवेल  पालिकेने सार्वजनिक शौचालयांची निगा ठेवणे, शौचालयांची दुरुस्ती,नुतणीकरण यासोबत खारघर परिसरातील मलनिःस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती व निगाठेवण्याचे कंत्राट लड्डा यांना दिले होते. लड्डा यांनी २२ ते २३टक्के कमी दर आकारुन हे काम मिळवले. पालिकेकडे एका तक्रारी अर्जातून लड्डा यांनी पालिकेला काम मिळविण्यासाठी दिलेल्या कागदपत्रामध्ये बनावट कागदपत्र असल्याची तक्रार मिळाली होती.

हेही वाचा >>>उरण : एनएमएमटी बस सेवा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी धरणे

त्यामुळे पालिकेने लड्डा यांच्या कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांची  छाननी केल्यावर त्यामध्ये लातुर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेतून ५८ लाख ९१ हजार ४२०रुपये व ७३ लाख ७१ हजार ८०९ रुपयांची अशा दोन बॅंक गॅरंटीचे बनावट कागदपत्र सापडले. त्यामुळे पालिकेच्या अधिका-यांनी लड्डा यांच्याविरोधात पोलीसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे लड्डायांनी विविध सरकारी कामे केली आहेत. पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम हे सुद्धा लड्डा यांनीच केले होते. त्यामुळे लड्डा यांनी केलेल्या सर्वच कामांमध्ये सादर केलेल्या बॅंक गॅरंटीची कागदपत्र तपासण्याची मागणी होत आहे.