गृहनिर्माण सोसायटीत राहणा-या श्वानाच्या उपद्रवामुळे सोसायटीच्या कमीटी मेंबरने इतर सदस्यांना जागरुक करण्यासाठी सोसायटीच्या आवारात श्वानाला शतपावली करणा-या त्याच्या मालकीणसह श्वानाचे चित्रीकरण केले. त्यानंतर हे चित्रीकरण सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये व्हायरल केले. संतापलेल्या श्वानमालकीणीने थेट पोलीस ठाणे गाठले. श्वानाच्या चित्रीकरणासोबत संबंधित सोसायटी सदस्याने या महिलेचे चित्रीकरण केल्याने तिला लज्जा उत्पन्न झाल्याची फीर्याद दिली. त्यामुळे पोलीसांना या जागरुक सोसायटी सदस्याविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवावी लागली.

हेही वाचा- उरणच्या मोरा जेट्टीवर वीज पडून विजेचा खांब कोसळला ; सुदैवाने कोणतीही हानी नाही

नवी मुंबईतील खारघर वसाहतीमधील सेक्टर आठ येथील शांतीनिकेतन या सोसायटीत हा प्रकार घडला. गुरुवारी सायंकाळी सात वाजता ४६ वर्षीय श्वानप्रेमी महिला तिच्या श्वानाला घेऊन सोसायटीच्या आवारात फिरत होती. याच सोसायटीत राहणा-या दीपक कुंभार यांनी तिचा पाठलाग केला आणि श्वानासोबतचे तिचे छायाचित्रण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. दीपक कुंभार हे बेस्टमध्ये काम करतात. तसेच दीपक यांनी केलेले चित्रिकरण सोसायटीच्या व्हॉट्सअॅपग्रुपवर पाठविले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संतापलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात दाद मागीतली. इतर श्वानप्रेमींनी सुद्धा संबंधित महिलेवर अन्याय होत असल्याने पोलीसांवर काय कारवाई करणार अशी विचारणा केली.

हेही वाचा- पत्नीशी वाईट बोलणाऱ्या व्यक्तीवर पतीकडून चाकूने वार; हल्ल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस स्थानकात हजर

या महिलेच्या श्वानामुळे शांतीवन सोसायटीच्या आवारात उपद्रव होत असल्याने दीपक पुरावे शोधत असताना त्यांच्या हातून श्वानासोबत महिलेचे सुद्धा छायाचित्रण झाल्याने हा गोंधळ झाला. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीपान शिंदे यांनी दीपक यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची शिक्षा सात वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना सीआरपीसी अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

Story img Loader