जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ या मार्गावर धुतुम व चिर्ले गावादरम्यान शनिवारी सकाळी ७ वाजता एक केमिकलचा कंटनेर उलटला . यामुळे केमिकलमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परिणामी मार्गावर जवळपास पाच किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा:उरण शहर व परिसरावर भरदिवसा पसरली धुक्याची चादर; धुके की प्रदूषण नागरिकांमध्ये शंका

जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यात आणि उरण तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३४८ वर शनिवारी सकाळी ७ वाजता हा अपघात झाल्याने, या मार्गावर पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातामध्ये केमिकल वाहून नेणारा कंटेनर उलटल्याने केमिकल रस्त्यावर पसरले, ज्यामुळे या मार्गवरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. घटनास्थळी वाहतूक पोलीस, अग्निशमन दल दाखल झाले असून, जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरु करण्यात आली आहे.