लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध गुन्हयात जप्त केलेल्या मुद्देमालाचे हस्तांतरण समारंभ आज पार पडला. सिडको ऑडीटोरियम मध्ये पार पडलेल्या कार्यक्रम वेळी आमदार मंदा म्हात्रे, गणेश नाईक, महेश मालदी, प्रशांत ठाकूर, पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्या सह सर्व उच्च पदस्थ पोलीस अधिकारी व फिर्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात ०१ जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२३ पर्यंत नवी मुंबई पोलीसांकडुन मालमत्तेविरोधातील गुन्हयांत आरोपींकडुन हस्तगत करण्यात आलेले होते. यात ५ कोटी ४१ लाख २७ हजार ६८३ रुपयांचा ऐवज पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला. यात २ कोटी ९ लाख २३ हजार तीनशे चौऱ्याऐंशी इतक्या किमतीचे सोने व रोख रक्कम एकुण ७४ फिर्यादींना परत करण्यात आले. तसेच ३ कोटी ३२ लाख ४ हजार नव्यानऊ इतक्या किमतीचा मुददेमाल (वाहन, मोबाईल, व इतर सर्वसाधारण मुददेमाल) १७४ फिर्यादींना परत करण्यात आला. असे एकुण २४८ फिर्यादींना हा ऐवज परत करण्यात आला.