पनवेल: २२ जानेवारीला अयोद्धा येथे होत असलेल्या प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशभरातील ११ जोडप्यांना विशेष निमंत्रित केले आहे. यामध्ये खारघर वसाहतीमधील विठ्ठल आणि त्यांची पत्नी उज्वला कांबळे यांचाही समावेश आहे. कांबळे यांच्याशी बातचित केल्यावर त्यांनी ३ जानेवारीला अयोद्धा येथे होत असलेल्या सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर घरात दिवाळी साजरी होत असल्याची भावना प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी शेवटच्या टप्यात आहे. अयोद्धयाचे नव्हेतर देशभरातील विविध उपनगरांमधील बाजारपेठा राममय झाल्या आहेत. भाजपतर्फे विविध उपनगरांमध्ये नमो चषकचे क्रीकेट सामने भरुन युवांना एकत्रित केले जात आहे. मंदीर न्यासाच्या कार्यक्रमात देशातून नव्हेतर परदेशातून जोरदार तयारी सूरु असून अनेक मान्यवर वेळात वेळ काढून रामांचे दर्शनासाठी नियोजन करत आहे. या दरम्यान ३ जानेवारीला अयोद्धा येथील मंदीरात राममुर्तींची प्राणप्रतिष्ठा होत असताना ११ विशेष जोडप्यांना बोलावण्यात येत आहे. यामध्ये नवी मुंबईतील खारघर येथे राहणारे विठ्ठल कांबळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना ३ जानेवारीला निमंत्रणाचा फोन आल्यावर कांबळे कुटूंबियांचे आनंदाश्रु अनावर झाल्याचे त्यांनी सांगीतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वजन्मीचे संचित, समाज आणि आईवडीलांचे आशिर्वाद यामुळे हा योग आल्याचे त्यांनी सांगीतले. कांबळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना ६ डिसेंबर  १९९२ या दिवसापासून ते आजपर्यंत म्हणजे ३२ वर्षात भव्य मंदीरामध्ये रामलल्लाची मुर्ती मंदीरात विराजमान होण्याची प्रत्येक हिंदु धर्मिय प्रतिक्षेत होते त्यांची ही प्रतिक्षा २२ जानेवारीला संपत असल्याचे त्यांनी सांगीतले. स्वता कांबळे हे त्यावेळी मंदीर बनविण्यासाठी अयोद्धयात गेले होते. कांबळे हे त्यावेळेचे साक्षीदार होते आणि भव्य मंदीराच्या निर्माणाचे साक्षीदार ठरत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि अन्य मंडळी यावेळी उपस्थित असणार आहेत. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या दाम्पत्यांना १५ जानेवारीपासून नियमांचं पालन करावं लागणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A couple from kharghar colony selected for pranapatistha ceremony of ram mandira in ayodhya amy