नवी मुंबई : आज सकाळी बाराच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर दहा येथे इमारत बांधकाम ठिकाणी क्रेन कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. मात्र उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नाही. रिझवान अली असे त्या गंभीर जखमी कामगाराचे नाव आहे. कोपरखैरणे सेक्टर दहा येथे एका इमारतीचे पुनर्निर्माण काम सुरू आहे. इमारत जमीनदोस्त केल्या नंतर क्रेन लावून काम सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र आज सकाळी बाराच्या सुमारास सदर क्रेन अचानक तुटली व खाली पडली. याबाबत साडेबाराला अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. जखमी व्यक्तीला बाहेर काढून प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले. अन्य दोन कामगार किरकोळ जखमी आहेत. या प्रकरणी तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अशी माहिती कोपरखैरणे पोलिसांनी दिली.