रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ दिवसाचे आयोजन नेरूळ येथे करण्यात आले होते. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई व नवी मुंबई शिव वाहतूक सेवा यांच्या वतीने जागतिक स्तरावर दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार म्हणून दि.२० नोव्हेंबरला हा दिवस आयोजित करून रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती करून अपघातात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- उरण चारफाट्यावर बेशिस्त वाहन पार्किंग; वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

या अनुषंगाने नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई शिव वाहतूक सेवेचे अध्यक्ष दिलीप आमले यांच्या पुढाकाराने रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती करण्यात आली. यावेळी वर्षभरात एकही अपघात न करणाऱ्या तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या रिक्षाचालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्वच रिक्षाचालकांची मी अपघात मुक्त आपले वाहन चालवेन अशी सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. त्याचबरोबर रस्ते अपघातात मुत्यु पावलेल्यांना श्रदांजली वाहिण्यात आली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A day was organized in nerul navi mumbai to commemorate the people who died and got injured in road accidents dpj