नवी मुंबई: ऐरोली येथे परिचित व्यक्तीने मद्य प्राशन करण्यास पैसे दिले नाहीत म्हणून दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून फिर्यादीवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबू कांबळे आणि अनिल शिंगे असे यातील आरोपींची नावे आहेत, तर राजकुमार तडवलगा हे फिर्यादीचे नाव आहे.  राजकुमार हे चिंचपाडा परिसरात राहत असून रविवारी  ऐरोली स्टेशन नजीक एका ठिकाणी वडापाव खाण्यास गेले होते. वडापाव खात असताना चिंचपाडा परिसरात राहणारे व राजकुमार यांच्या परिचित असलेले बाबू आणि अनिल हे दोघे त्या ठिकाणी आले. त्यांनी राजकुमार यांना मद्य प्राशन करण्यास पैसे मागितले. याला राजकुमार यांनी पैसे नसल्याचे कारण सांगितले व तेथून निघून गेले.

हेही वाचा… पनवेल : अन्यथा ९२ कामगार मंत्रालयासमोर आत्महत्या करतील

मात्र त्यांचा पाठलाग करीत बाबू आणि अनिल यांनी राजकुमार यांना अडवले , व  लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे सूर केले. त्याच ठिकाणी एक पडलेला बांबू उचलून त्यानेही राजकुमार बेशुद्ध पडेपर्यंत  मारहाण केली. हे बाब राजकुमार यांच्या घरच्यांना कळल्यावर ते घटनास्थळी आले आणि त्यांनी राजकुमार यांना वाशीतील मनपा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार केल्यावर काही तासांनी शुद्ध आल्यावर राजकुमार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बाबू आणि अनिल यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A familiar person did not pay for the liquor two people beat him up in navi mumbai dvr