उरण : मोरा बंदरात गळाने मासे पकडणाऱ्या मासेमाराला किळशी(सापा सारख्या दिसणारा मासा)तब्बल दहा फूट लांबीचा मासा आढळला आहे. समुद्रात अनेक प्रकारच्या साधनांचा वापर करून मासेमारी केली जाते. अशाच प्रकारे छोटे आणि हौसी मासेमार समुद्रात आणि किनाऱ्यावर बसून नायलॉनच्या दोरीला छोट लोखंडी गळ लावून त्याला माश्यासाठी घास लावले जाते. आशा प्रकारे मासे पकडण्याची पद्धत आहे. या गळाच्या पद्धतीत ही मासेमारी करणाऱ्यांना चांगल्या प्रकारची मासळी मिळते. यात छोटी मोठी दोन्ही प्रकारची मासळी मिळते. अशाच प्रकारची मासेमारी करणाऱ्या युवकाला हा किळशी मासा आढळला आहे.
अतिशय चविष्ट आणि काटेरी मासा : सापा सारख्या दिसणाऱ्या या माशाला किळशी म्हटलं जातं. अतिशय चिकट असलेल्या या माशाला प्रचंड काटे असतात. मात्र या माशाची चव ही अप्रतिम असते. त्यामुळे ज्यांना हा मासा खाण्याची सवय आहे. तेच हा मासा खाऊ शकतात.