नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे नोड मधील बोनकोडे गाव स्थित चार माळ्याची इमारत कोसळली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. या इमारतीच्या शेजारी असलेलीही इमारत कधीही पडू शकते या शक्यतेने तिही रिकामी करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास बोनकोडे गावातील चार माळ्याची इमारत कोसळली. सदर इमारतीचा धोकादायक इमारतीत समावेश नव्हता. मात्र दोन दिवसांपासून ही इमारत हलत असल्याचे अनेक रहिवाशांना जाणवत होते. शुक्रवारी कोपरखैरणे भागात अचानक झालेल्या जोरदार पावसात इमारतीतील काही रहिवाशांनी इतरत्र आसरा शोधला. शुक्रवारी इमारत कललेली आहे हे लक्षात आल्याने ३४ कुटुंबीयांनी इमारत रिकामी केली आणि शनिवारी इमारत कोसळली. अगोदरच रहिवाशांनी इमारत रिकामी केल्याने मोठी जीवित हानी टळली. अशी माहिती मनपाचे सहाय्यक उपायुक्त प्रशांत गावडे यांनी दिली. तुझेच याच इमारती लगत असलेली इमारतही अशाच अवस्थेत असल्याने तातडीने तीही इमारत रिकामी करण्यात आली तेथील रहिवाशांची सोय नजीकच्या मनपा शाळेत करण्यात आली अशी माहिती अग्निशमन दल प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.

Story img Loader