उरण : तालुक्यातील चिरनेर येथील आदिवासी पाड्यातील गणेश बबन कातकरी या चार वर्षाच्या मुलाला सोमवारी मण्यार जातीचा सापाने दंश केला. यावेळी त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला आहे. सर्प दंशा नंतर चिरनेर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रमेश फोफेरकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीधर मोकल यांच्या सहकार्याने वाशी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. सोमवारी होळीचा सण असल्यामुळे तो आपल्या आईसोबत रात्री साडेआठच्या सुमारास होळीच्या पूजनाला गेला होता. त्यावेळी त्याला हा मण्यार जातीचा साप चावला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गणेशवर तेथील डॉक्टरांनी ताबडतोब योग्य ते उपचार सुरू केले, त्यामुळे तो बालबाल बचावला असून, आता त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून, त्याला लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
चार वर्षीय आदिवासी मुलाला सर्प दंश, वेळेत उपचार झाल्याने मुलाचे प्राण वाचले
तालुक्यातील चिरनेर येथील आदिवासी पाड्यातील गणेश बबन कातकरी या चार वर्षाच्या मुलाला सोमवारी मण्यार जातीचा सापाने दंश केला.
Written by लोकसत्ता टीम
नवी मुंबई
First published on: 07-03-2023 at 21:19 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A four year old tribal boy bitten snake timely treatment saved the boy life ysh