नवी मुंबई: अमेकरिन चलन असलेले डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून २ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार रविवारी नवी मुंबईतील घणसोली येथे घडला. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अन्वर आणि एक वीस वर्षीय  युवक असे यातील आरोपींची ओळख असल्याची पोलीस दफ्तरी नोंद करण्यात आली आहे. गुलफाम आलम  अफसर अली असे फिर्यादीचे नाव असून ते कांदिवली येथे राहणारे आहेत. त्यांच्या परिचित एका नारळ विक्रेत्याने त्यांना २० डॉलरची नोट दाखवली होती.  काही दिवसापूर्वी एक फोन आला व फोनवरील व्यक्तीने तो नारळ विक्रेत्याच्या भाऊ असल्याचे सांगितले व भावाने जशी नोट  दाखवली तशा  त्याच्या कडे एक हजार सातशे पन्नास प्रति २० डॉलरच्या नोटा असल्याची माहिती दिली. तसेच गरज असल्याने या नोटाच्या बदल्यात भारतीय रुपये हवे असल्याचे सांगितले. २ लाख भारतीय रुपयांच्या बदल्यात हे डॉलर देण्यास त्याची एक नातेवाईक तयार असल्याचे त्याने सांगितले. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याने घणसोली नजीक एका ठिकाणी बोलावले. 

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Allegations of fraud with 1700 flat buyers in Taloja housing project Developer Lalit Tekchandanis arrest is illegal
तळोजा येथील गृहप्रकल्पातील १७०० सदनिका खरेदीदारांच्या फसवणुकीचा आरोप, विकासक ललित टेकचंदानी यांची अटक बेकायदा

हेही वाचा… पाणजे मार्गावर गवतासह वृक्षांचीही होळी; समाजकंटकांकडून गवताना आग

स्वस्तात एवढी मोठी रक्कम मिळते म्हणून अफसर याने पत्नीचे दागिने गहाण ठेवत २ लाख रुपये जमा केले व घणसोली  येथे ठरल्या प्रमाणे गेले. त्याठिकाणी फोनवर बोलणारी व्यक्ती आणि त्याच्या सोबत विशीतील एक तरुण आला होता. अफसर याने दोन लाख रुपये दाखवत असतानाच त्याने हे पैसे पटकन हातात घेतले व डॉलरचे पुडके अफसर यांच्या पिशवीत टाकून पटकन घ्या कोणी पहिले असे सांगत निघूनही गेले. ते गेल्यावर जेव्हा पिशवीतील डॉलरचे पुडके पहिले तेव्हा केवळ वर एक डॉलरची नोट  तर त्याखाली नोटेचा आकाराचे कागदी पुडके होते. याबाबत अफसर यांनी दिलेल्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Story img Loader