पनवेल : नवी मुंबईत महिलांच्या सूरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ६२ वर्षांच्या आजी त्यांच्या नातवाला शाळेतून घरी आणण्यासाठी शाळेबाहेरील रस्त्यावर रिक्षात बसल्या होत्या. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने या आजींच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. हा सर्व प्रकार सायंकाळी चार वाजता ऐरोली येथील सेक्टर १७ मधील गॉडस एम.बी.ए. फाऊंडेशन शाळेसमोर घडला. या आजींनी चोरट्याने गळ्यातील साखळीला हिसका दिल्यावर न घाबरता गळ्यातील सोनसाखळी पकडून ठेवली. आजीच्या धाडसामुळे २१ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळी पैकी ६ ग्रॅम सोने चोराच्या हाती लागले. या सर्व प्रकाराबद्दलची फीर्याद रबाळे पोलीसांना शुक्रवारी दिल्यावर या आजींनी पोलीसांना हा चोर पुन्हा पाहील्यास मी नक्की होळखीन असेही सांगीतले. घराबाहेर नोकरी आणि कामानिमित्त पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी नवी मुंबई, पनवेलमध्ये धुमाकुळ घातला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा