पनवेल: खांदेश्वर वसाहतीमध्ये प्रवेशद्वारावरील सिग्नलवर अर्धाफूटापेक्षा कमी खोल खड्डा पडल्याने वाहने या खड्यात आपटत आहेत. चालक व प्रवाशांना या खड्डयाचा त्रास सहन करुन प्रवास करावा लागल्याने प्रवासी पनवेल महापालिकेच्या कारभारावर संतापत आहेत. मागील चार महिन्यात पालिकेकडे मालमत्ता कराचे १७० कोटी रुपये जमा केले मात्र रस्त्यातील खड्यांची दुरुस्ती पालिका का करत नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

पनवेल महापालिकेने सिडको वसाहतीमधील रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी उपाययोजना सूरु केली. मात्र तरीही सर्वच सिडको वसाहतींमध्ये पालिकेने लहान खड्डे तातडीने न बुजवल्याने खड्यांचे प्रमाण वाढले आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पनवेलचे कार्याध्यक्ष महादेव वाघमारे हे सुद्धा खांदेश्वर वसाहतीमध्ये राहतात. बुधवारी वाघमारे यांचे वाहन खांदेश्वर वसाहतीच्या प्रवेशद्वारावरील सिग्नलजवळील मोठ्या खड्यात आदळले. त्यामुळे संतापलेल्या शेकापचे पदाधिकारी वाघमारे यांनी तातडीने वसाहतीमधील खड्डे पालिकेने न भरल्यास नागरिक आंदोलन उभे करतील असा इशारा दिला आहे.

हेही वाचा… वाहतूक पोलिसांच्या मदतीने रिक्षात विसरलेली बॅग अवघ्या वीस मिनिटात मिळाली परत…

खांदेश्वर वसाहतीमध्ये प्रवेशव्दारावरील सिग्नलसोबत नॅशनल बॅंकेच्या चौकात, इंद्रआंगण इमारतीच्या चौकात, नवीन पनवेल आणि खांदेश्वर वसाहतीला जोडणा-या पुलाच्या चढ आणि उतारावर खड्डे आहेत. तसेच या उड्डाणपुलाखालच्या रस्त्यापासून डीमार्ट ते एचडीएफसी सर्कलपर्यंत महानगर गॅसवाहिनी भूमीगत करण्यासाठी केलेल्या खड्याची दुरुस्ती अद्याप केली नसल्याने नवीन पनवेलचे नागरिक खड्यांना वैतागले आहेत.

Story img Loader