नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढली असून भगवा या जातीच्या डाळिंबांना प्रचंड मागणी आहे. लाल चुटुक आणि साखरेप्रमाणे गोड असणाऱ्या या डाळिंबांनी फळ बाजार सजले आहेत. हिवाळ्यात आता डाळिंब भाव खाऊन जात आहे. हाडे मजबूत करण्यासाठी डांळिंब खाण्याचा सल्ला आजीच्या बटव्यात हमखास आढळतो. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या राजस्थान येथून डाळिंबाची आवक वाढली असून ठोक बाजारात ५० ते १०० रुपये प्रतिकिलो ही डाळिंब मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे याच भगवा जातीचे मात्र महाराष्ट्रातील बीड, संभाजी नगर सोलापूर धाराशिव जिल्ह्यातून डाळिंब दाखल होत आहेत. मात्र महाराष्ट्रातील डाळिंबांना प्रति किलो ७० ते १५०रुपये दर मिळत आहे. राज्यातील डाळिंबाचे बी आकाराला छोटे व रस जास्त तर राजस्थान डाळिंबात बी काहीसे जाड व महाराष्ट्र डाळिंबाच्या मानाने रस कमी असतो. त्यामुळे राज्यातील डाळिंबांना तुलनेने चांगला भाव मिळत आहे अशी माहिती डाळिंबाचे व्यापारी हर्षल जेजुरीकर यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A huge inflow of pomegranate in apmc navi mumbai asj
Show comments