उरण: खलापूर येथील इरसाल वाडी दरडीची घटना ताजी असतांनाच गुरुवारी सायंकाळी उरण शहरालगतच्या डाऊर नगर मध्ये दरड कोसळली आहे. या घटनेची उरणच्या तहसीलदारानी पाहणी केली असून सुरक्षेच्या कारणास्तव येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरणच्या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी डाऊर नगर ही मोठी वस्ती आहे. चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या या वस्तीत ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे उरण मध्ये ही दरडीचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा… एपीएमसीत डाळी, कडधान्य महागले; घाऊकमध्ये प्रतिकिलो दरात १० रुपयांनी वाढ

डाऊर नगर मधील घराशेजारील डोंगराच्या मातीचा भाग खचला आहे. त्यामुळे हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन सुरक्षा म्हणून येथील नागरीकांची बैठकीत त्यांना सुरक्षेसाठी इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याची सूचना करण्यात येणार असल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

उरणचा द्रोणागिरी पायथा धोकादायक

उरणकरांसाठी ऐतिहासिक व पौराणीक महत्व असलेल्या द्रोणागिरी डोंगराचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे या डोंगराला धोका निर्माण झाला आहे. या पायथ्याशी नागरी वस्ती आहे. त्याच्या व डोंगराच्या सुरक्षेसाठी येथील ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी आंदोलने ही केली आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A landslide in daur nagar near uran city and the residents will be evacuated dvr