उरण : जेएनपीए बंदरावर आधारीत सेझ मधील सोनारी गावा शेजारील प्लॉट क्रमांक ई -४ वरील आर.के. स्वीटमार्स प्रायव्हेट लिमिटेड या खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपनीला बुधवारी सकाळी १० वाजता आग लागल्याची माहिती पोलीसांनी दिली. या आगीने काही तासात रुद्र रूप धारण केल्याने धुराचे प्रचंड लोट जेएनपीए बंदर आणि येथील नागरी विभागात पसरले होते. या आगीमुळे सोनारी,जसखार,करळ, सावरखार या गावात मोठ्या प्रमाणात उग्र दर्प पसरला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी जेएनपीए,सिडको व ओएनजीसी आदी विभागातील अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. कंपनीतील खाद्यपदार्थ व प्लस्टिक आणि पुठ्ठे यांनी आग पकडल्याने या आगीचा भडका उडाला होता. आगीचे कारण समजले नसून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.