नवी मुंबई : नवी मुंबई लगत असणाऱ्या ठाणे बेलापूर आद्योगिक पट्ट्यात पावणे येथील सी १५७ भूखंडावरील सुजन कंपनीच्या गो डाऊन मध्ये आग लागली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य असलेले पिंप ठेवलेले होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच कोणी जखमी झाल्याचे आढळून आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पावणे एमआयडीसीतील सुजन या कंपनीत आग लागली. ही आग कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गो डाऊन मध्ये आग लागली. या ठिकाणी रसायन भरलेले पिंप फुटू लागल्याने पाहता पाहता आगीच्या भक्ष्यस्थानी पूर्ण कंपनी पडली. सदर कंपनीला लागून असलेल्या महेक   कंपनीला ही आगीची झळ बसली. आगी बाबत माहिती मिळताच पावणे, महापे, शिरवणे एमआयडीसी अग्निशमन दल दाखल झाले. मात्र आगीची रौद्रता पाहता नवी मुंबई मनपा अग्निशमनचीही मदत घेण्यात आली आहे.  सध्या आग आटोक्यात आली असली तरी पूर्ण नियंत्रण मिळवणे आणि त्या नंतर कुलिंगचे काम रात्री उशिरापर्यंत चालेल अशी माहिती उपस्थित अग्निशमन कर्मचाऱ्याने दिली.