नवी मुंबई :गेल्या महिन्याभरापासून नवी मुंबई शहरात वायू प्रदूषणाचा विळखा वाढतच आहे. विरोधात विविध स्तरातून आवाज उठवण्यात येत आहे. मात्र तरी देखील शहरातील प्रदूषण परिस्थिती कायम आहे. नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीच कारवाई होताना दिसत नाही,शिवाय प्रदूषणाचा त्रास आहेच. त्यामुळे अखेर वाशी से.२६ येथील रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा उचला असून ‘स्वच्छ हवा हा माझा अधिकार’ या हक्कासाठी सेक्टर २६ वाशी येथील नागरीक चिंतामणी चौकात शांतीमय मार्गाने प्रशासनाला जाग येई पर्यंत प्रत्येक रविवारी सायं ७ ते ८ वेळेत रस्त्यावर आंदोलनाला बसून प्रदूषणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई शहरात विशेषतः नेरुळ, वाशी आणि कोपरखैरणे या विभागात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या नोंदीनुसार नेरुळ वाशी मधील हवा गुणवत्ता निर्देशांक ही खालावला असल्याचे कित्येक वेळा निदर्शनास आले आहे. शहरात आधी रात्रीच्या वेळी धुरकट वातावरण आणि उग्र वास सुरू होता मात्र आता सकाळी ६ नंतर ही वातावरणात धुके आणि दर्प वास येत आहे. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील प्रदूषण वाढत आहे,याकडे मात्र नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ गांभीर्याने पहाताना दिसत नाही. त्यामुळे प्रदूषणा करणाऱ्या औद्योगिक कंपन्यावर कठोर कारवाई व्हावी, शहरातील प्रदूषण थांबाव्हे यासाठी वाशी से२६ येथील नागरिकांनी प्रशासनाविरोधात तसेच ‘स्वच्छ हवा हा माझा अधिकार ही मोहीम हाती घेतली आहे. दर रविवारी वाशी से.२६ येथील चिंतामणी चौकात शांतीमय मार्गाने प्रशासनाला जाग येई पर्यंत प्रत्येक रविवारी सायं ७ ते ८ वेळेत रस्त्यावर बसून आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. नागरीकांनी वारंवार तक्रार करूनही प्रदुषण जैसे थे असल्यामुळे नवी मुंबई विकास अधिष्ठाणचे अध्यक्ष संकेत डोके यांनी ‘स्वच्छ हवा हा माझा अधिकार’ या मोहिमेला सुरूवात केली असून जास्तीत जास्त नागरीक या मोहिमेत सहभागी होऊन वायू प्रदूषणा विरोधात जनतेचा आवाज वाढेल, ज्यामुळे प्रशासनाला वायु प्रदुषणाचा प्रश्न मार्गी लावावाच लागेल असे मत अध्यक्ष संकेत डोके यांनी व्यक्त केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A mass movement posture of residents to wake up the administration against pollution in the city navi mumbai amy
Show comments