नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर १ मध्ये एका पेपर कंपनीला लागली भीषण आग लागली असून चार तासांच्या पासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही वेळापूर्वी आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे. ऐरोली सेक्टर १ येथे वीट भट्टी परिसरा जवळ असणाऱ्या पेपर कंपनीला साडेतीनच्या सुमारास लागली आग. पेपर पुठ्ठे असे आग लगेच पकडणारे साहित्य असल्याने आग काही क्षणात सर्वत्र पसरली.

हेही वाचा >>> “दीड फुटाच्या आमदाराची जीभ…” विद्या चव्हाणांचा नितेश राणेंवर हल्लाबोल

A major fire broke out at a plastic factory in Bhosari
पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
fire company Pimpri-Chinchwad, fire Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
Massive fire breaks out in building in sion
शीवमधील इमारतीला भीषण आग
Massive fire breaks out in 13 floor building in Andheri Mumbai
अंधेरीत १३ मजली इमारतीला भीषण आग; आगीचे गांभीर्य वाढले
Lakshmi Niwas
लक्ष्मी निवास मालिकेत ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री; जय श्री कृष्णा मालिकेत केलेले काम
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

VIDEO:

अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विजवण्याचा प्रयत्न करीत असून रबाळे एमआयडीसी  वाशी नेरुळ कोपरखैरणे ऐरोलीतील मनपा अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास पाठवल्या गेल्या. पुठ्ठे असल्याणारे खूप धूर होत आहे त्यामुळे आग विझवण्यास अडथळे निर्माण होत आहेत. आग ज्या कंपनीला लागली त्याच्या शेजारी असणाऱ्या २ मेकॅनिकल वर्कशॉप कंपन्यांना देखील लागली आग लागली होती.

हेही वाचा >>> “जादूटोणा करणे बंद करा, अन्यथा…”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

आगीत एक महिला अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून एक जवान ही किरकोळ भाजला आहे. आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी पुठ्ठे पेपर असल्याने वारंवार धुमसत्या आगीने आग पकडत आहे. अशी माहिती ऐरोली अग्निशमन दलाने दिली. तसेच आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्या नंतरच आगी लागण्याचे कारण ? आग रोधक यंत्रणा होती का ? तसेच अन्य माहिती तपासात समोर येईल असे सांगण्यात आले.

Story img Loader