नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली खाडी किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच जमा झाला आहे. वाढती उष्णता आणि रासायनिक प्रदूषणाने हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच माशांचे प्रमाण कमी झाले त्यात  या प्रकाराने मच्छीमार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

ऐरोली खाडी प्रदूषित झाली असली तरी प्रशासन फारसे गंभीर नाही. असा आरोप नेहमीच स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरण प्रेमी करत असतात. आज त्याचा प्रत्येय आला आहे. आज (सोमवारी) सकाळी काली, ओलंबी, जितडा , खेकडा, कोळंबी अशा सर्वच प्रकारचे मासे मृत अवस्थेत खाडी किनारी हजारोंच्या संख्येने आढळून आली. विशेष म्हणजे जाळ्यात अडकलेले मासे ही मृत अवस्थेत होते. अशी मच्छी आरोग्याच्या दृष्टीने खाण्यास अयोग्य असल्याने विकत नाहीत. असा प्रकार दर वर्षी होतो. याला सर्वात महत्वाचे कारण म्हणजे डास मारण्यासाठी कांदळवनात फवारणी करणे तसेच रासायनिक रंग असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जन आहे. असा दावा दिनकर पाटील या मच्छीमार व्यावसायिकाने केला आहे. 

हेही वाचा… मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू

याची नुकसान भरपाई गेल्या वर्षी मिळाली मात्र त्यापूर्वी तीन वर्षे मिळाली नव्हती असा आरोपही पाटील यांनी केला आहे. रात्री अपरात्री एमआयडीसीतील रासायनिक उत्पादन आणि वापर करणाऱ्या कंपन्या निरूपयोगी रासायनिक पाणी प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडतात त्यामुळेही असा प्रकार होतो असा दावा मनसे शहर प्रमुख निलेश बानखिले यांनी केला आहे. 

Story img Loader