दिघा परिसरात एक निर्वस्त्र व्यक्ती अपरात्री फिरत असून काही खाजगी सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद झाला आहे. त्याच्या बाबत समाज माध्यमातून पोलिसांनाच विचारण्यात आले. त्यात आपल्याला कोणी पकडू नये म्हणून चोरटे निर्वस्त्र होऊन फिरत असल्याचे सर्वत्र परसरले या बाबत पोलीस तपास करीत असून त्या निर्वस्त्र फिरणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली  असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाणार आहे. 

हेही वाचा >>> महामार्ग पोलीस अधिका-यांच्या बदलीत लाखोंची उलाढाल

नवी मुंबईतील दिघा परिसरातील दाट  लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टी भागातून एक निर्वस्त्र व्यक्ती रात्री फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. यात सदर व्यक्तीच्या मागे धावणारा एक व्यक्तीही पाठलाग करत असल्या प्रमाणात दिसून येत आहे. या बाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना छेडले असता. या प्रकरणी कुठलीही तक्रार आलेली नाही. नेमका प्रकार काय आहे अशी विचारणा केल्या नंतर तपास सुरु केला. सदर व्यक्तीची पूर्ण माहिती मिळाली असून लवकरच ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असेल. त्या व्यक्तीने असा प्रकार नेमका का केला ? याची माहिती घेऊन पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. असे पाटील यांनी सांगितले. 

Story img Loader