तालुक्यातील कासारभट गावातील दोन शेजारच्या महिलांचे सोमवारी सायंकाळी मृत उंदरावरुन आपापसात भांडण झाले. मेलेल्या उंदरावरुन झालेल्या भांडणात एक महिलेने दूस-या महिलेच्या मांडीचा चक्क चावा घेतला. या घटनेनंतर दोन्ही घरच्या मंडळींना रुग्णालय व पोलीस ठाण्यापर्यंत पळापळ करावी लागली.

हेही वाचा >>> उरण : ‘ती’ बोट संशयित नसल्याचा पोलिसांचा दावा ; बोटीतील अतिरिक्त ३५० लिटर डिझेल प्रकरणी एक आरोपी अटकेत

कासारभट गावातील मिनाक्षी म्हात्रे यांच्या घरामागील तुळशी वृंदावनासमोर मृत उंदीर गोणपाटामध्ये पडला होता. यावरुन हा वाद सुरु झाला. मिनाक्षी यांनी गोणपाटात मेलेला उंदीर कोणत्या कावळ्याने टाकला असे बोलल्यामुळे त्यांच्याशेजारी राहणा-या मनिषा व त्यांचे पती संतोष म्हात्रे आणि मुलगी अनुष्का यांचा प्रचंड संताप झाला.

हेही वाचा : नवी मुंबई : वेदांत फॉक्सकॉन कंपनी गुजरातला राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

मिनाक्षी या घरासमोर जाब विचारण्यासाठी गेल्या असताना म्हात्रे कुटूंबियांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मिनाक्षी यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मिनाक्षी यांच्या मांडीला मनिषा यांनी चावा घेतल्याचा आरोप मिनाक्षी यांनी पोलीसांत केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या मिनाक्षी यांना गंभीर दुखापत झाली आहे. अखेर हे प्रकरण तालुका पोलीस ठाण्यात गेले त्यानंतर येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांनी मनिषा व त्यांचे पती संतोष आणि मुलगी अनुष्का यांच्या विरोधात जबरी मारहाण केल्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे मिनाक्षी व मनिषा हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

Story img Loader