नवी मुंबई: राज्य सरकारचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे नवी मुंबईतील कोपर खैरणे स्थिती दुय्यम निबंधक कार्यालय मागील अनेक वर्षापासून जुन्या इमारतीत कार्यरत होते, खरेदी विक्री करायला येणाऱ्या नागरिकांना आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करूनही जागेचा शोध सुरू असल्याचे सांगून त्याच जागी काम करण्याची वेळ कर्मचाऱ्यांना येत होती.
शेवटी नवीन कार्यालयाला जागा मिळाली असून,हे नवीन कार्यालय खैरणे एमआयडीसी परिसरात एलोरा ओलिओरीस इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुरू करण्यात आले असून, सर्व सेवा आणि सुसज्ज अशा कार्यालयाचे उद्घाटन विभागाचे प्रभारी प्रबंधक डी.बी.वळवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
हेही वाचा… ओला, उबेर कंपनीच्या मोटारीतील प्रवास खरंच सुरक्षित आहे का? बातमी नक्की वाचा
या पुढील कामकाज याच कार्यालयात चालणार असल्याचे वळवी यांनी सांगितले. त्यामुळे जुन्या कार्यालयात होणारी गैरसोय यापुढे नागरिकांना होणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले त्यामुळे तासंतास थांबायला लागणाऱ्या आणि गैरसोय होणाऱ्या नागरिकांना चांगले कार्यालय मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.