नवी मुंबई : सार्वजनिक शौचालयातील बेसिनमध्ये चेहरा धूत असताना शेजारी उभ्या असलेल्या युवकाच्या अंगावर पाणी उडाले. त्यावर माफी मागूनही त्या युवकाने व त्याच्या मित्राने फिर्यादीला बेदम मारहाण करीत कटरने वार करून पळ काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नवी मुंबईत युलू सायकलपेक्षा ई बाईकला अधिक पसंती; महापालिकेच्या गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणार २७४ युलू सायकल

हेही वाचा – नवी मुंबई : आता तरी वेगावर नियंत्रण येणार का? वजरानी चौकातील अपघातग्रस्त प्रदर्शनीय गाडी वेधतेय लक्ष

हरी राम आणि अभिषेक दुर्गेश्वर, अशी आरोपींची नावे आहेत. तर रोहित भगत, असे फिर्यादीचे नाव आहे. रविवारी रोहित हा ऐरोली सेक्टर १८ येथील कै. रामदास पाटील उद्यानात फिरण्यास गेला होता. काही वेळाने याच उद्यानातील सार्वजनिक शौचालयात तो लघुशंकेसाठी गेला. लघुशंका झाल्यानंतर तेथील बेसिनमध्ये हात, चेहर धूत असताना त्याच्याकडून शेजारी उभ्या असणाऱ्या हरी याच्या अंगावर पाणी उडाले. त्यावर हरीने अर्वाच्च शिवी दिली. त्याला तसाच प्रतिसाद न देता रोहितने पाणी उडाल्याबद्द्ल माफी मागितली. मात्र शौचालयाच्या बाहेर येताच हरी आणि त्याच्या मित्राने रोहित याला बेदम माराहण सुरू केली. त्यातील एकाने स्वतःकडील कटरने रोहित याच्या चेहऱ्यावर वार केला. हा वर कपाळावर लागून रोहित रक्तबंबाळ झाला. तो पर्यंत आसपासचे लोक धावत आल्याने दोन्ही आरोपी पळून गेले. रोहितला मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले व उपचार करून सोडून देण्यात आले. त्यानंतर रोहितने मंगळवारी रबाळे पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person was attacked with a cutter in navi mumbai ssb