नवी मुंबई : नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात अचानक अजगर आला. पोलीस ठाण्यात प्रवेश करताच समोर एक खोली असून येणाऱ्या तक्रारदाराची तक्रार तेथेच घेतली जाते. विशेष म्हणजे हा अजगर एखाद्या तक्रारदाराप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करत थेट अंमलदाराच्या खोलीत शिरला आणि एका कोपऱ्यात विसावला.
हेही वाचा – Video: वाशी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्रवाशाचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद….
नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात अचानक अजगर आला. अजगर एखाद्या तक्रारदाराप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करत थेट अंमलदाराच्या खोलीत शिरला आणि एका कोपऱ्यात विसावला.https://t.co/2jrmCKvB4K#navimumbai #cbd pic.twitter.com/VbRHkxYkzJ
— LoksattaLive (@LoksattaLive) September 10, 2024
शनिवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. अजगर प्रवेश करत तो एका कोपऱ्यात शांतपणे विसावला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांना देत सोबतच उलवा येथील एका सर्पमित्राला बोलावले. पोलीस ठाण्याच्या शेजारीच अग्निशमन कार्यालय असल्याने आपत्कालीन पथकही पोलीस ठाण्यात दाखल झाले. सुमारे दोन तासांत सर्पमित्रांनी त्याला पकडले व सर्वांनी निश्वास सोडला. पोलीस ठाण्याच्या मागे सुमारे तीनशे मीटरवर एक उद्यान असून त्याच्या मागे गर्द झाडी आहे. अजगर तेथूनच आला असावा असा अंदाज आहे. अजगराने कुठलेही नुकसान केले नसून बिनविषारी होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.