अल्पवयीन मुलीचा दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून सहा दिवसात शोध

उरण येथील पागोटे गावातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २६ ऑक्टोबर रोजी बिहारचा तरुण जितेंद्र उर्फ जितू याने जबरदस्तीने पळवून अपहरण केल्याची तक्रार उरण पोलीसात दाखल करण्यात आली होती. आरोपीच्या मोबाईलचा तपास करीत उरण ते बेंगलोर, तमिळनाडू चेन्नई, आणि नागपूर असा रस्ते मार्गाने २ हजार ७१३ किलोमीटरचे अंतर पार करून आरोपी सह मुलीला शोधून तिच्या आई वडिलांच्या ताब्यात सहा दिवसात सुखरूप परत दिली आहे. पोलिसांच्या या माणुसकीचे दर्शन या निमित्ताने झाल्याची चर्चा आहे.

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!

हेही वाचा >>> कोपरखैरणेत पार्किंगचा बोजवारा, खेळाच्या मैदानावर वाहनांचे अतिक्रमण

या गुन्हयातील अल्पवयीन मुलीची तात्काळ सुटका  करणेसाठी परिमंडळ दोनचे पोलीस उप आयुक्त पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त  , वपोनि सुनील पाटील उरण यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे पोलीस हवालदार उदय भगत, रतन राठोड असे पोलीस पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने शोध घेत आरोपीने त्याचा मोबाईल स्विच ऑफ करते वेळी त्याचे शेवटचे लोकेशन बंगळरू येथे असल्याचे प्राप्त झाले होते. वरिष्ठांच्या सुचने प्रमाणे, इतर कोणताही दुवा नसताना तात्काळ पोलीस पथक  आरोपीच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनच्या आधारे गुरुवारी(२७) ला बंगळरू येथे ९५० किमी चे अंतर खाजगी वाहनाने पार करून पोहचले. आरोपीने त्याचा मोबाईल पुन्हा चालू करुन बंद केला. त्यावेळी आरोपीचे लोकेशन बदलून ई रोड रेल्वे स्थानक तामिळनाडू येथे आले. सदर आरोपीत रेल्वे स्टेशन वरून पुन्हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास तिकडे जाऊन पकडण्यासाठी पथक इ रोड रेल्वे जंक्शन तामिळनाडू च्या दिशेने रवाना झाले.  तेव्हा वेल्लोर २१२ किमी तामिळनाडू येथे पुन्हा आरोपीचे शेवटचे लोकेशन चेन्नई असे प्रप्त झाले. वेल्लोर येथून २६४ किमी प्रवास करून चेन्नई येथे तपास पथक पोहचले असता आरोपीने पुन्हा त्याचा मोबाईल बंद केला. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे कंट्रोल रूम जीआरपी यांचे सी आर ओ यांना व्हाट्सअप द्वारे पुढे मुलीचा व आरोपीचा फोटो मोबाईल वर पाठवून गुन्ह्याची माहिती देऊन फोटोतील वर्णनाचे मुलीचा व आरोपीचा शोध घेणे बाबत त्याप्रमाणे जीआरपी मार्फत रेल्वे स्थानकात शोध मोहीम घेण्यात आली.

हेही वाचा >>> नवी मुंबईकरांनो पाण्याचा वापर जपून करा, गतवर्षीपेक्षा मोरबे धरणात कमी पाणीसाठा

त्यादरम्यान आरोपीने पुन्हा मोबाईल चालु करुन बंद केला असतां त्याचे लोकेशन नागपूरच्या दिशेने प्रवास करताना दिसून आले.  सदर आरोपी मोबाईल चालू करतेवेळी येणारे टॉवर लोकेशन, त्या मार्गीकेवरून जाणाऱ्या रेल्वे गाड्याचे  वेळापत्रक, ताळ मेळ घालून राप्ती सागर १२५२२ ट्रेन मधून पुढे जात असल्याचे तांत्रीक तपासावरून निष्पन्न करून नागपूर जी आर पी मुख्य नियंत्रण कक्ष यांना माहिती दिली. त्याप्रमाणे आरोपीचा जी आर पी मार्फत शोध घेतला पण आरोपी टॉयलेटमध्ये लपून राहिल्याने मिळून आला नाही. शेवटी आर पी एफ एफ, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांना संपर्क करून प्रस्तुत गुन्ह्यांची माहिती देण्यात आली व आर पी एफ पोलीस निरीक्षक  बनकर, पोलीस उपनिरीक्षक श्री सिंग, व स्टाफ यांच्या मार्फत सदर गाडीचे अमला जंक्शन येथे सर्च ऑपरेशन करून रेल्वे गाडी अतिरिक्त दहा मिनिटे थांबवून आरोपीचा मागील जनरल डब्यातून शोध घेऊन ताबा घेण्यात आला. सदर पोलीस पथक चेन्नई रेल्वे स्थानक येथून १२८७ किमी खाजगी वाहनाने आमला रेल्वे स्टेशन येथे पोहोचून त्यांनी आरोपीचा व पीडित मुलीचा ताबा घेतला असून सदर गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.