नवी मुंबई : येथील पामबीच मार्गालगतच्या पाणथळींना लागून खाडीच्या बाजूस असलेले काही एकरांचे एक मोठे बेटच निवासी संकुलांसाठी खुले करण्याचा निर्णय ‘सिडको’ने घेतला आहे. या पाणथळी म्हणजे लाखो फ्लेमिंगोंचा अधिवास असून त्या बिल्डरांसाठी खुल्या करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय आधीच वादात सापडला असताना, सिडकोच्या या निर्णयामुळे वादात भर पडणार आहे.

नैसर्गिक पाणथळी आणि ठाणे खाडी किनाऱ्याच्या मधोमध असलेल्या ‘करावे द्वीपा’च्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारने २०१७ मध्ये सिडकोकडे सोपविले होते. लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना मार्च २०२४ मध्ये सिडकोने ‘करावे द्वीपा’चा प्रारुप विकास आराखडा जाहीर केला. निवडणुकांच्या हंगामातच हरकती, सूचना मागविण्यात आल्या. आराखड्यानुसार, सिडकोने या द्वीपावरील विस्तीर्ण उद्यानासाठी असलेले आरक्षण बदलून ते रहिवासी वापरासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. नवी मुंबईत फ्लेमिंगोंच्या अधिवासाची हक्काची ठिकाणे सीवूड्स, बेलापूर पट्ट्यात तयार झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या (पान ११ वर)

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही

पानथळींपाठोपाठ नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुले!

निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र या जागा पाणथळींच्या नसल्याचा ‘सिडको’चा युक्तिवाद आहे.

मध्यंतरीच्या काळात, खाडीच्या मार्गात बेकायदा बांध टाकून पाणथळी कोरड्या करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. शेकडो कोटी रुपये किमतीच्या जमिनींवर देशातील एका बड्या उद्याोजकाचा डोळा असल्याचे सांगितले जात असून त्यासाठीच पाणथळीच्या जागांवर निवासी संकुले उभारण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी नगरविकास विभागाने एक आदेश काढत नवी मुंबई महापालिका हद्दीतील काही भागांच्या विकासाचे विशेष अधिकार सिडकोला दिले. यामध्ये ‘करावे द्वीपा’च्या काही एकर क्षेत्राचा समावेश आहे. त्यावेळी संपूर्ण द्वीप मध्यवर्ती उद्यानासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या निर्णयासंबंधी ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सविस्तर माहिती घेऊन सांगते असे उत्तर दिले.

सीआरझेड, पोहोच रस्त्यांचा अडथळा?

जमिनीच्या विकासात सीआरझेडचा अडथळा होण्याची शक्यता आहे. तसेच द्वीपाच्या दिशेने जाण्यासाठी भराव टाकून पाणथळीच्या जागा बुजवून पोहोच रस्ते करता येणार आहेत. असे झाल्यास फ्लेमिंगोचा मोठा अधिवास बुजविला जाईल, अशी पर्यावरणप्रेमींना भीती आहे.

करावे द्वीप आणि आसपासच्या परिसरात पर्यावरणीय व्यवस्था उभी राहिली आहे. हा द्वीप निवासी संकुलांसाठी खुला करण्याचा निर्णय म्हणजे पाणथळींच्या जागा, खारफुटी, पक्ष्यांचा अधिवास तसेच खाडीलगतचे संपूर्ण पर्यावरण नष्ट करणे आहे. एकीकडे आपण पर्यावरणच्या दृष्टीने सजग असल्याचे सरकार म्हणते आणि दुसरीकडे संवेदनशील पट्टा उखडून टाकण्यासाठी वेगाने पावले उचलली जातात, हे धक्कादायक आहे. – – सुनील अग्रवाल, संस्थापक, ‘सेव्ह नवी मुंबई फोरम’

Story img Loader