नवी मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून पुढील ५० ते ६० दिवसात पहिले विमान उड्डाण करण्याची आखणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेड आणि सिडको मंडळाने केल्यामुळे विमानतळाच्या उड्डाणापूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विविध परवानग्या घेण्यासाठीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून मंगळवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) संचालक फैज अहमद किडवई आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपीन कुमार यांनी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेतला.

पाच महिन्यांपूर्वी (११ ऑक्टोबर) नवी मुंबई विमानतळावर भारतीय हवाई दलातर्फे इन्स्ट्रूमेन्ट लॅंडिंगची चाचणी आणि २९ डिसेंबरला इंडिगोतर्फे प्रवासी विमानाची यशस्वी लॅंडिंग चाचणी धावपट्टीवर पार पडली होती. यावेळी नागरी विमान वाहतूक सूरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम आणि सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सिडकोच्या परिवहन व विमानतळ विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक गीता पिल्लई, एनएमआयएएलचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी सोमवारी (२४ फेब्रुवारी) नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली होती.

व्यापक मूल्यमापन

  • नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या भेटी दरम्यान महासंचालनालयातर्फे विमानतळाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले.
  • नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सीवे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग सिस्टीम इ. महत्त्वाच्या क्षेत्रांची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
  • या पाहणी दरम्यान एनएमआयएएल कंपनीने उपस्थितांची मॉक चेक-इन प्रक्रिया आयोजित केली होती. या प्रक्रियेमध्ये बनावट बोर्डिंग पास आणि बनावट बॅगेज टॅग जारी केले. येथील सुरक्षा यंत्रणेने बनावट पास आणि टॅग हे प्रवेशव्दारावरच पडताळणी कऱण्याच्या प्रक्रियेविषय़ी पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Story img Loader