नवी मुंबई : नवी मुंबईतील सी वूड येथील खाडी किनारी असलेल्या एनआरआय कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू वसाहतीतील एक भिंत पडून तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या वेळी गाडीत वा गाडी लावलेल्या ठिकाणी कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा – खारघरमध्ये रस्ता खचला, काँग्रेसकडून रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
आज सकाळी ११ च्या सुमारास सी वूड नोडमधील उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनआरआय कॉम्प्लेक्स या रहिवासी इमारतीतील फेस २ इमारत क्रमांक ५७ येथील कंपाउंडची भिंत पडली. या भिंतीला लागून गाड्या पार्क केल्या जातात. ही भिंत दगडी असल्याने येथे पार्क करण्यात आलेली एक मर्सिडीज, एक महिंद्रा बोलेरो आणि एक सुझुकी स्विफ्ट गाडी अशा तीन गाड्यांवर भिंत कोसळली. यात तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती नेरुळ अग्निशमन दलाने दिली.