उरण येथील करंजा बंदरात सोमवारी एक संशयित बोट ताब्यात घेण्यात आली असून उरण पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत. उरण ते रेवस या अरबी समुद्रातील दोन बंदराच्या परिसरात उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी गस्त घालत असतांना त्यांना वीना क्रमांकाची बोट जात असल्याचे निदर्शनास आले असता. या संशयित बोटीचा रेवस बंदरातील सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांना माहिती दिल्या नंतर संशयित बोट उरणच्या करंजा बंदरात नांगरण्यात आली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : सागरी किनारा मार्गाचा ‘सल्ला’ महागला; सल्लागाराचे शुल्क ३४ कोटींवरून ५० कोटींवर
या बोटीचा उरण पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळाला उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली. बोटीत डिझेल आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी बंदरात गस्ती घालीत असतांना विना क्रमांकाची बोट आढळून आली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती उरणचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सुरेश बहुलगावे यांनी दिली