नवी मुंबई: सिडकोच्या अतिक्रमण पथकाला येऊ न देण्यासाठी थेट जेसीबी लावून रस्ता अडवणाऱ्या शंभरपेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे विचुंबे, ता. पनवेल, जि. रायगड येथील नैना अधिसुचित क्षेत्रात गट क. २३५ या ठिकाणी बांधलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी सिडको अतिक्रमण पथक गेले असता हा प्रकार घडला.

संतप्त जमाव तसेच  सिडको अतिक्रमण पथकाच्या विरोधातील रोष पाहून कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोहीम स्थगित करावी लागली. सिडको अतिक्रमण मोहिमेला विरोध करणाऱ्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

हेही वाचा – नेरुळ, सारसोळे गावात दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याच्या तक्रारी, महापालिका प्रशासनाचा मात्र नकार

बळीराम पाटील, राजेश केणी, शेखर शेळके, वासुदेव भिंगारकर, वामन शेळके, सुभाष भोपी व इतर अंदाजे १०० व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी बाराच्या सुमारास सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक हे पोलीस बंदोबस्तासह मौजे विचुंबे, ता. पनवेल, जि. रायगड येथील नैना अधिसुचित क्षेत्रात पोहोचले. येथील गट क. २३५ या  बळीराम पाटील व इतर यांच्या मालकीच्या जमिनीवर विकासक अच्छेलाल यादव, रमेश वाघमारे यांनी अंदाजे १ हजार चौरस मीटर या क्षेत्रावरील बांधकाम केले होते. हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची मोहीम राबवण्यासाठी सिडकोने गुरुवारी प्रचंड पोलीस फौजफाटा नेला होता. मात्र विचुंबे गावाकडे जाणाऱ्या पुलावर राजेश केणी (रा सुकापुर ता. पनवेल,) शेखर शेळके (रा आदई ता. पनवेल,) बळीराम पाटील (रा. विचुंबे ता. पनवेल,) वासुदेव भिंगारकर (रा. विचुंबे ता. पनवेल,) वामन शेळके (रा. मोहपाली, ता. पनवेल,) सुभाष भोपी (रा. रिटघर दुद्रे, ता. पनवेल) यांच्यासह अंदाजे १०० लोकांचा जमाव जमला होता.

हेही वाचा – पनवेल महापालिका क्षेत्रातील पहिला करोनाबाधित खारघरमध्ये

या जमावाने  सिडको पथकाचा रस्ता जेसीबी आडवा लावून अडवला. त्यावेळी सिडको पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, “आम्ही तुम्हाला नैनामध्ये पाय ठेवू देणार नाही, पुढे जाऊ देणार नाही. आमचे जेसीबी येथे आहे, अशी धमकी दिली. तसेच  मागच्या आठवड्यात तुमच्या अधिकाऱ्यांना हरिग्राम येथून आम्ही हाकलून दिले आहे. नैनामध्ये पाय ठेवाल तर ठार मारू, अशी धमकी दिली आहे. जमावाने तुमच्या जिवाचे बरेवाईट केले तर त्याची जाणीव ठेवा असे म्हणून आक्रमकपणे बोलू लागले. तुम्ही हे बांधकाम कसे तोडता हे आम्ही बघतो, असे म्हणून जीविताला धक्का पोहोचवण्याची धमकी दिली. यावेळी सिडको विरोधात घोषणाबाजी करीत जमाव पुढे पुढे सरकत होता. जमावाचा प्रक्षोभ व वाढत जाणारी आक्रमकता तसेच होणारी वाहतूक कोंडी यामुळे मोहीम रद्द करण्यात आली. तसेच मोहिमेला अटकाव करणाऱ्यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.