नवी मुंबई  : ऐरोली सेक्टर सहा येथे एका  इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर उचकटून एका चोरट्याने आत प्रवेश केला मात्र या बाबत पोलिसांना माहिती मिळताच तेही तातडीने घटनास्थळी पोहचले व चोराला रंगेहात पकडले.ऐरोली सेक्टर ६ येथे निखिल जैन यांचे यश नावाचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. सकाळी दुकान उघडण्यापूर्वी माल वाहतूक करणारा टेम्पो चालक आणि अन्य कर्मचारी आले होते. त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे आढळून येताच त्यांनी पाहणी केली त्यावेळी आत मध्ये एक अनोळखी  व्यक्ती असल्याचे आढळून आले.

त्यांनी तात्काळ पोलीस आणि जैन यांना फोन करून हि माहिती दिली. जैन येण्यापूर्वीच पोलिसांनी आत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता फिरोज अहमद शेख असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. तो मुंबईत मोहम्मद अली रस्त्याशेजारील झोपडपट्टीत राहणारा असून हमाली करतो असेही समोर आले. त्याने सदर दुकानाचे शटर उचकटून आतील ५० हजाराची चोरलेली रोकड जप्त करण्यात आली आहे.

Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ