नवी मुंबई : बेलापूर येथील एक महिला प्रभात फेरी मारत असताना न्यायालय इमारतीच्या समोर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळून गेला. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>>सोमवारी नवी मुंबईत ओबीसी आरक्षण कृतज्ञता मेळावा
यातील फिर्यादी या सेक्टर १५ येथे राहतात. त्या नियमित प्रभात फेरीला ( मॉर्निग वाँक) जातात. शुक्रवारी सकाळीही त्या प्रभात फेरी मारत असताना साडे आठच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वयाचा इसम त्यांच्या अचानक त्यांच्या मागे आला. त्या इसमाने फिर्यादीच्या मागून फिर्यादीच्या गळ्यातील ४ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळून गेला. या वेळी त्यांनी आरडाओरडा केला व त्याला धरण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती लागला नाही. याच वेळी घडला प्रकार पाहणारा व आरडाओरडा ऐकणाऱ्या अन्य एक व्यक्ती चोरट्यांचा मागे धावला मात्र काही अंतरावर दुचाकीवर थांबलेल्या त्याच्या साथीदार समवेत तो पळून गेला.
हेही वाचा >>> उरण : जोरदार पावसाचा भात शेतीला फटका ; शेतकरी चिंताग्रस्त
पोलिसांना फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार मंगळसूत्र हिसकवणारा हा दिसायला सावळा वय अंदाजे २०ते२५, उंची अंदाजे ५ फूट ६ इंच, अंगात शर्ट पॅन्ट परिधान केला होता . तर दुचाकीवर थांबलेल्या आरोपीचे वय अंदाजे ३० ते ३५ , वर्ण काळा, उंची ५ फूट ८ इंच आणि त्याने अंगात शर्ट पॅन्ट परिधान केलेला होता. न्यायालय इमारत समोरील रस्त्यावर झालेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मोरे काम करीत आहेत.