नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच दिवशी अपहरणाचे पाच प्रकार घडले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाणे अंतर्गत चार गुन्हे दाखल असून या पैकी एका गुन्ह्यात दोन जणांचे अपहरण झाले होते.
४ डिसेंबर रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकूण सात अपहरण गुन्ह्यांची नोंद झाली होती. या सात पैकी एका गुन्ह्यात दोन जणांचे अपहरण झाल्याचे नमूद असल्याने गुन्हे सात नोंद असले तरी आठ जणांचे अपहरण झाले होते. हे सर्व गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती अल्पवयीन आहेत . त्या पैकी पाच गुन्ह्यांची उकल झाली तर अन्य दोन प्रकरणांचा तपास सुरू आहे. या सात गुन्ह्या पैकी पाच गुन्हे उकल करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला यश आले आहे.
कोपरखैरणे पोलीस ठाणे अंतर्गत अपहृत १२ वर्षीय मुलगा प्रज्वल सचिन पाटील, हा ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात मिळून आला आहे. कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंद प्रकरणातील अपहृत मुलगी कु. अनुष्का जगदीश राजभर, (वय १३ वर्ष १०) महिने हिचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता ती ऐरोली परिसरात असून तिच्याशी संपर्क झाला आहे तिला ताब्यात घेण्याकरता पथक पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा… पनवेल शहरामध्ये ८ डिसेंबर ते १५ जूनपर्यंत आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद
तिसऱ्या प्रकरणात कामोठे पोलीस ठाणे अंतर्गत अपहृत मुलगी अंतरा संदीप विचारे ( वय १३ वर्ष, ११ महिने, ) हिचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता ती गुजरात येते असून तिच्या नातेवाईकांसोबत रात्री पावणे बारा वाजता घरी परत येणार आहे.
या शिवाय कोपरखैरणे पोलीस ठाणे मधील अपहृत मुलगा आयान वासिम खान (वय १५ वर्ष, ) हा फिर्यादी यांच्यासोबत पोलीस ठाणे येथे हजर झाला आहे.तसेच कळंबोली पोलीस ठाणे अंतर्गत आरती राजकुमार वाल्मिकी (वय १२ वर्ष )व दिव्या विजय गुप्ता (वय१४ वर्ष ) त्या दोघी जीवदानी मंदिर विरार येथे गेल्या असून त्या परत आल्या आहेत.
या शिवाय रबाळे आणि पनवेल पोलीस ठाणे अंतर्गत अपहरण प्रकरणी तपास सुरू आहे. यात पनवेल पोलीस ठाणे अंतर्गत अपहृत मुलिस वारंवार पळून जाण्याची सवय आहे तिच्यासोबत संशयित मुलगा असून त्यांचा फोन स्विच ऑफ येत आहे. अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी दिली.