मुख्यमंत्री पद असताना घराघरापर्यंत पोचू शकले नाहीत. आणि आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर स्वतःच्या नावाचा पक्ष काढून घराघरात मशाल घेऊन जात आहेत. मात्र, आम्हाला काय घरात आग लावायची नाही, असा टोला राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी लगावला आहे. वाशी येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई शहराचे लँडमार्क वंडर्स पार्क लवकरच खुले होणार; नव्या खेळण्यांसह देखण्या पार्कचे मेकओव्हर

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी चिन्ह देण्यात आली होती. उध्दव ठाकरे यांच्या मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले तर शिंदे गटाला आज चिन्ह देण्यात येणार आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचे चिन्ह आहे. त्यांच्या नावाने कोणतेही चिन्ह मिळाले तरी ते आम्हाला मान्य असेल, असे सत्तार म्हणाले.

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना असून त्यांनी स्वतःच्या नावाने उद्धव बाळासाहेब ठाकरे असा नवीन पक्ष काढला आहे. आगामी सर्व निवडणूक कोणाला कौल मिळेल याबाबत लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले . मशाल याला माझा विरोध नसून सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना प्रत्येक घरात पोहचता आले नाही,आता पद गेल्यानंतर हाती मशाल घेऊन घराघरात आगी लावू नका, अशी टीका सत्तार यांनी केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar criticize uddhav thackeray after gets a flaming torch mashaal as the new party symbol navi mumbai news dpj