नवी मुंबई महापालिकेने १५ फेब्रुवारीपासून ३१ मार्चपर्यंत थकीत मालमत्ता करावर ६० टक्के सूट देणारी अभय योजना लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. ज्या नागरिक आर्थिक अडचणींमुळे मालमत्ता कर विहीत वेळेत भरू शकले नाहीत अशा मालमत्ताकर धारकांना त्यांच्या थकबाकीमुळे लागलेल्या दंडात सवलत मिळावी यादृष्टीने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर सूट मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबई : उरण बाह्यवळण रस्त्याला विरोध; अटक केलेल्या ३० मच्छिमारांची जामिनावर सुटका

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील

मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याने व यामधून प्राप्त होणा-या महसूलातूनच विविध नागरी सुविधा कामे केली जात आहेत. नियमित कराच्या वसूलीप्रमाणेच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी थकित मालमत्ताकराच्या वसूलीकडेही तितकेच बारकाईने लक्ष दिले आहे. मागील दोन वर्षांपासून करोना प्रभावित काळातील टाळेबंदी तसेच लाटेच्या कमी-अधिक झालेल्या प्रभावामुळे अनेकांच्या उद्योग, व्यवसायावर तसेच नोकरीवरही परिणाम झालेला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : उरणच्या चिट फंड घोटाळ्यातील आरोपीला अटक; १० कोटींची रोख रक्कम जप्त

सन २०२२-२३ चे आर्थिक वर्ष ३१मार्च २०२३ रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वी मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा व महानगरपालिकेचा थकीत मालमत्ता कर वसूल होऊन ही रक्कम नागरिकांच्या सेवासुविधांसाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सकारात्मक दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून नागरिकांना दिलासा देणारी ही अभय योजना लागू केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईतील इ-टॉयलेट संकल्पना अयशस्वी, पारंपरिक शौचालय बांधण्याचा निर्णय

तरी मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी नवी मुंबई शहराच्या विकासासाठी आपले योगदान देत विशेष अभय योजनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि लगेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या http://www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन सवलतीच्या दंडात्मक रक्कमेसह थकीत मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.