महिलेची छेड काढल्या प्रकरणी एका आरोपीस २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी त्याला जामीन मिळाला. दरम्यान हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना आरोपी नोटीस देऊनही कधीही तारखेला उपस्थित राहिला नव्हता. शेवटी न्यायालयाने त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक आदेश दिले. होते.

हेही वाचा- पत्नीला अश्लील मेसेज करणाऱ्याला जाब विचारल्यावर पतीला झाली बेदम मारहाण

न्यायालयाकडून अजामीन अटक करण्याचे आदेश

राहुल बडदाळे असे अटक आरोपीचे नाव आहे. नेरुळ येथील एका मोठ्या रुग्णालयातील पारीचारिकेची त्याने छेड काढली होती. या प्रकरणी विनयभंग कलमान्वये गुन्हा नोंद करून त्याला अटकही करण्यात आली होती. काही आठवड्यात त्याने जामिनावर स्वतःची सुटका करून घेतली. मात्र त्यानंतर न्यायालयाच्या तारखांना तो कधीही उपस्थित राहिला नाही. जेव्हा न्यायालयाने त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक आदेश दिले त्यावेळी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

हेही वाचा- पनवेल : पोयंजे गावात वृद्धाचा खून

अखेर पोलिसांनी पाळत ठेऊन केली अटक

त्याच्या मूळ गाव असलेले कर्नाटक राज्य जिल्हा बिदर येथील बसवकल्याण येथेही शोध घेण्यात आला. मात्र, तो हाती लागला नाही. दरम्यान सोमवारी तो उलवे येथे राहणाऱ्या त्याच्या मामाकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पाळत ठेऊन त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला जामीन देण्यात आला.

Story img Loader