नवी मुंबई: शीळ फाटा वाहतूक पोलिसांनी जप्त केलेला टेम्पो सोडवण्यासाठी त्यांनी १४ हजाराची लाच मागितली होती. मात्र तक्रारदार टेम्पो चालकाने लाच न देता थेट लाच लुचपत विभागाकडे केल्यावर ‘त्या’ चार वाहतूक पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार केली.
सचिन मधुकर भोसले दिलीप मालू सातपुते, आणि इतर दोन कर्मचारी असे आरोपींची नावे आहेत. हि सर्व वाहतूक पोलीस विभागात हवालदार या पदावर कार्यरत आहेत. यातील तक्रारदार यांचे मालकीचा महिद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप टेम्पो शीळ फाटा चौकीला थांबवून ठेवला होता, सदर टेम्पो सोडण्यासाठी सदर आरोपींनी टेम्पो चालकाकडे १४ हजराची लाच मागितली होती. तडजोड अंती ३ हजार रुपये देण्याची ठरले. या बाबत नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची शहानिशा करून शनिवारी दुपारी त्या चारही वाहतूक पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.