उरण : शहरातील वाहतूक कोंडीवरील उतारा असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. हा दुहेरी मार्ग २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे उरणकरांसाठी ही सुवार्ता आहेवाढत्या उरण शहराची कोंडी दूर करण्यासाठी सिडकोकडून उरभारण्यात येत असलेल्या उरण बाह्यवळण मार्गाचे काम पावसात ही सुरू होते. या एलव्हेटेड पुलाच्या १७ पैकी ११ बीमचे काम झाले आहेत. तर उर्वरित बीमचे काम दसऱ्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला तर उरण पनवेल रस्त्याकडील काही भागात वीज पुरवठा करणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वाहिन्या जात असल्याने या वाहिन्यामुळे काम रखडले आहे. या संदर्भात महावितरण कंपनीने वाहिन्या हटविण्याची निविदा दिली आहे. त्यामुळे लवकरच उरण शहराला जोडण्याऱ्या बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या मार्गाची उरणकरांना मागील दोन दशकापासून प्रतिक्षा आहे. २००८ ला बोकडवीरा येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी केलेल्या मागणी नंतर सिडकोने या मार्गाचे काम करण्यासाठी निविदा काढली होती. मात्र पर्यावरणीय मंजुऱ्या आणि स्थानिक मच्छिमारांचा विरोध यामुळे हे काम थांबले होते. उरण मधील वाढती लोकसंख्या व वाहनांमुळे उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. सध्या उरण शहरात नागरीकांना पहाटे पासून रात्री पर्यंत कोंडीचा सामना करावा लागत आहे. याचा फटका येथील विद्यार्थ्यांना ही बसत आहे. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळात कोंडीत भर पडत आहे.
हेही वाचा >>>फ्रेंड्स सोल्युशनच्या नावाने अवैध व्हायग्रा, लेव्हिट्रा विक्री; २३ जणांवर गुन्हा दाखल
वाहनतळाचा अभाव : उरण शहरात नगरपरिषदेचे वाहनतळ नसल्याने अनेक वाहने रस्तावर उभी केली जात आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यातील वाढते हातगाडे यांचा ही वाहतुकीला अडथळा होत आहे.
पर्यायी मार्ग : उरण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचा प्रस्ताव वीस वर्षा पासून आहे. यासाठी सिडकोने तयारी दर्शवुन निधी ही मंजूर केला होता. यामध्ये उरण पनवेल मार्गावरील पेट्रोल पंप ते मोरा मार्ग असा या मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभाग,किनारपट्टी नियमन (सीआरझेड)यांच्या परवानग्या मिळण्यास विलंब झाल्याने हा मार्ग रखडला होता. त्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी परवानग्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर २०२२ पासून या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा मार्ग २०२४ पर्यंत उरणच्या बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने यावर्षी पावसात ही काम सुरू होते.
कामाचा खर्च वाढला : २७ कोटी रुपये खर्चाचा या मार्गाचा खर्च वाढून तो ४७ कोटींवर पोहचला आहे.