उरण : शहरातील वाहतूक कोंडीवरील उतारा असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. हा दुहेरी मार्ग २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे उरणकरांसाठी ही सुवार्ता आहेवाढत्या उरण शहराची कोंडी दूर करण्यासाठी सिडकोकडून उरभारण्यात येत असलेल्या उरण बाह्यवळण मार्गाचे काम पावसात ही सुरू होते. या एलव्हेटेड पुलाच्या १७ पैकी ११ बीमचे काम झाले आहेत. तर उर्वरित बीमचे काम दसऱ्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला तर उरण पनवेल रस्त्याकडील काही भागात वीज पुरवठा करणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वाहिन्या जात असल्याने या वाहिन्यामुळे काम रखडले आहे. या संदर्भात महावितरण कंपनीने वाहिन्या हटविण्याची निविदा दिली आहे. त्यामुळे लवकरच उरण शहराला जोडण्याऱ्या बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या मार्गाची उरणकरांना मागील दोन दशकापासून प्रतिक्षा आहे. २००८ ला बोकडवीरा येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी केलेल्या मागणी नंतर सिडकोने या मार्गाचे काम करण्यासाठी निविदा काढली होती. मात्र पर्यावरणीय मंजुऱ्या आणि स्थानिक मच्छिमारांचा विरोध यामुळे हे काम थांबले होते. उरण मधील वाढती लोकसंख्या व वाहनांमुळे उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. सध्या उरण शहरात नागरीकांना पहाटे पासून रात्री पर्यंत कोंडीचा सामना करावा लागत आहे. याचा फटका येथील विद्यार्थ्यांना ही बसत आहे. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळात कोंडीत भर पडत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा