पनवेल : शीव पनवेल महामार्गावरील कळंबोली सिग्नलवर सध्या डीजीटल व्यवहारातून दान स्विकारणे आणि विविध वस्तू खरेदी करण्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सूरु आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील बालकांच्या हातून रोकडरहीत व्यवहारांकडे कल वाढल्याने देश लवकरच संपुर्ण डीजीटल व्यवहाराकडे वाट असल्याचे चित्र कळंबोली सिग्नलकडे पाहायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात सर्वाधिक म्हणजे १७ रस्ते एकमेकांना आपसात एकत्र मिळण्याचे कळंबोली सिग्नल हे ठिकाण आहे. या भव्य सिग्नलवर एकदाचे वाहने  थांबली की त्या वाहनांच्या काचांवर बोटांची टक टक केली जाते. ही टक टक करणारी बालके यापूर्वी भिक मागत होती. सध्या या बालकांचा वापर वस्तू विक्रीसाठी केला जातो. वाहनातील देवा-याचे हार, फुलं आणि फळे येथे बालक विक्री करतात. या परिसरात पंधराहून अधिक बालक व त्यांच्यासोबत ८ प्रौढ व्यक्ती व्यवहार करतात.

हेही वाचा >>> स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत २३ जूनला वाशीत ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या’

ज्यावेळेस वाहनतील प्रवासी आणि चालक विक्रीसाठी तयारी दर्शवित नाहीत त्यावेळेस ही बालके त्यांच्या हातातील डीजीटल व्यवहाराचे फलक दाखवून त्या फलकावरील क्यूआर कोडवर मदत पाठवू शकतात अशीही विनंती करतात.  मागील वर्षी डीसेंबर महिन्यात केंद्रीय दूरसंचार विभागाने देशभरात डी़जीटल व्यवहाराच्या उलाढालीतून १५०० अब्ज डॉलरचे म्हणजेच १ लाख २१ हजार ७५३ अब्ज रुपयांची देवाणघेवाण झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली. याच वेगाने आर्थिक दुर्बल घटकातील नवी पिढा डीजीटल व्यवहार करु लागल्यास भविष्यात देश संपुर्ण डीजीटल व्यवहार करणारा होईल.