पनवेल: तालुक्यामधील जुन्या पूणे मुंबई महामार्गावर बारवाई गावासमोरील मार्गात दुचाकीवरुन रेल्वेस्थानकापर्यंत जाणा-या एका दुचाकीस्वाराला अनोळखी वाहनाने पाठीमागून धडक देऊन ठार केले. या अपघातामध्ये ५६ वर्षीय अनैय्या दोडाघट्ट रंगप्पा यांचा मृत्यू झाला.
भोकरपाडा येथील हिरानंदानी फोर्च्युन सीटी या महागृहनिर्माण प्रकल्पात मागील अनेक वर्षांपासून अनैय्य हे पत्नी व दोन मुलांसोबत राहत होते. मुंबईतील बीपीसीएल कंपनीच्या रिफायनरीचे ते मुख्य व्यवस्थापक होते. दररोज सकाळी पावणे सहा वाजता ते स्वताच्या दुचाकीने पनवेल रेल्वेस्थानकापर्यंत जात असतं. त्यानंतर ते रेल्वेने मुंबईला जात होते.
हेही वाचा… वाढीव वितरणासाठी जलबोगदे; सिडको वसाहतींच्या भविष्यातील पाण्याची गरज भागणार; तीन हजार कोटींची योजना
मंगळवारी सकाळी अनैय्य हे नेहमीप्रमाणे स्वताच्या दुचाकीवरुन रेल्वेस्थानकाकडे जात असताना सकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास बारवई गावालगतच्या पूणे मुंबई महामार्गावर त्यांना अनोळखी वाहनाने पाठीमागून उडवून ते अनोळखी वाहन निघून गेले. सकाळी सव्वा सात वाजता अनैय्य यांच्या घरी पोलीस आल्यावर या अपघाताबाबत त्यांच्या कुटूंबियांना समजले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अनैय्य यांना मृत घोषित केले होते. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांचे पथक भरधाव वेगाने अनैय्य यांना उडवून गेलेल्या संशयित वाहनाचा शोध घेत आहेत.