नवी मुंबई : पुणे – भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी नजर कैदेत असणारे गौतम नवलखा हे पुन्हा प्रकाश झोतात आले आहेत. आज ( शनिवारी) दिल्ली पोलिसांनी काही प्रकरणाची त्यांची झाडाझडती घेतली. मात्र नेमकी कशाची चौकशी केली याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ जानेवारी २०१८ मध्ये भीमा कोरेगाव युद्धाला दोनशे वर्षे झाल्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. मात्र या ठिकाणी अचानक दंगल उसळली. त्या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनेकांना अटक झाली त्या पैकीच एक पत्रकार असलेले गौतम नवलखा हे आहेत. त्यांनी या घटनेनंतर झालेले आरोप फेटाळले होते. मात्र २०२० मध्ये राष्ट्रीय सुरक्षा समिती समोर त्यांनी शरणागती पत्करली. तेव्हापासून ते नवी मुंबई सीबीडी येथे ते न्यायालयाच्या आदेशाने नजरकैदेत आहेत. मात्र आज अचानक दिल्ली पोलीस या ठिकाणी धडकले व त्यांनी नवलखा यांची चौकशी सुरू केली.

हेही वाचा… घरफोडी करणाऱ्या शिकलगार टोळी सूत्रधार अटक… ४ गुन्हे उघडकीस

हेही वाचा… नवी मुंबई : भगवा डाळिंब खात आहे भाव; राजस्थान, मराठवाडा आणि सोलापूरातून मोठी आवक

आज दिवसभर नवलखा यांच्याशी दिल्ली पोलिसांनी अनेक बाबतीत चौकशी केली मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार विदेशातून मिळणारे अर्थ साहाय्य , त्याच्याशी संपर्क, अतिरेकी संघटना संबंधित व्यक्तींशी संबंध याबाबत चौकशी केली गेली. मात्र याबाबत कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार झाले नाही. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused of bhima koregaon riots case gautam navlakha interrogated once again in navi mumbai asj
Show comments