पनवेल : हैद्राबादला न येणाऱ्या पत्नीवर अ‍ॅसीड हल्ला केल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावात घडली आहे. २० जानेवारीला तळोजा येथील खैरणे गावात ही घटना घडली असून याबाबतचा रितसर गुन्हा दोन दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. अ‍ॅसीड फेकणारा २८ वर्षीय पती अद्याप पोलिसांच्या हाती सापडला नसला तरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पश्चिम बंगाल येथील मूळ निवासी असणारे रमजान गाझी आणि अमिना खातून हे दाम्पत्य खैरणे गावातील प्लॉट नंबर १७ रिझवान कंपनीशेजारी भाड्याने राहत होते. रमजाण हा बांधकामात मोलमजूरी करायचा तर अमिना ही कंपनीत कंत्राटी कामाला जात असे. या दोघांनाही तीन मुले आहेत. मागील काही दिवसांपासून रमजान याने पत्नी अमिनाकडे येथे राहण्याऐवजी हैद्राबादला जेथे बहीण राहते तिकडेच काम पाहू आणि तिकडेच राहण्याचा हट्ट केला. अमिनाचा हैद्राबादला जाण्यास विरोध होता. त्यामुळे काही दिवसांपासून या दोघांमध्ये किरकोळ वाद सुरु झाले. १९ जानेवारीला रात्री असेच भांडण झाले होते. मात्र पहाटे दोन वाजता अमिना व मुले झोपली असताना रमजाण हा अ‍ॅसीड घेऊन घरी आला. मुले झोपली असताना अमिनाला उठवून त्याने तीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसीड फेकून तिला जखमी केले.

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Water supply cut off in Malad Mumbai news
मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

हेही वाचा – नामांकित खाद्य पदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड करून विदेशात  विक्री, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

अमिनाने अंगावर पांघरुण घेतल्याने अ‍ॅसीड फेकल्यानंतर ते अ‍ॅसीड तीच्या चेहऱ्यावर थोडेच उडाले. मात्र तीचा चेहरा २० टक्यांपेक्षा अधिक भाजला. जखमी अवस्थेमधील अमिनाला शेजारच्यांनी मदत केली. तीला तातडीने औषधाच्या दूकानातून आणलेले मलम लावल्यानंतर तीने येथे न राहण्याचा निर्णय घेतला आणि गाव गाठण्यासाठी थेट रेल्वेस्थानक गाठले. सध्या तीच्यावर कोलकाता येथील एनसीएमसी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या परिसरातील बनियापुकुर या स्थानिक पोलिसांनी संबंधित घटनेचा गुन्हा नोंदविल्यानंतर हा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. १० फेब्रुवारीला याबाबतचा रितसर गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी नोंदविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक अर्चना कुदळे यांच्याकडे हे गंभीर प्रकरण सोपविले.

हेही वाचा – मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे यांनी फरार रमजाणचा शोध सुरु करुन अमिनाच्या अंगावर हल्ला झाला त्यावेळचे त्यांच्या घरातील कपडे या प्रकरणात जप्त केल्याचे लोकसत्ताला सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून रमजाणच्या शोधासाठी स्वतंत्र एक पथक नेमण्यात आले आहे. रमजाणने अतिघातक क्षमतेचे असलेले अ‍ॅसीड कसे मिळवले याचा शोध घेत आहेत. रमजान हा पश्चिम बंगालमधील बासंती तालुक्यातील शिमुलतुल्ला गावात राहणारा होता. २०२१ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अ‍ॅसीड हल्ला झाला होता. त्यानंतरची ही दूसरी घटना आहे.

Story img Loader