नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात बेकायदा राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या चारही लोकांच्या कडे भारतीय नागरिक असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता. सदर कारवाई मुंबई दहशदवाद विरोधी पथकाने केली आहे. कमाल रियाज चौधरी,(मुळ गाव: पोस्ट पिरौली, थाना- कालिया, जिल्हा नराइल, देश  बांगलादेश )  कामरुल कलाम चौधरी, (जिल्हा नराइल, देश  बांगलादेश )  सोहेल अफसर खान,(पोस्ट पिरोली, थाना- कालीया, जिल्हा नराइल, देश  बांगलादेश  आलमगीर ओली कियारा शेख, ( देश  बांगलादेश ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई नागपाडा दहशदवाद विरोधी पथकाला नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात बांगलादेशी नागरिक राहत असून भारतात त्यांनी  अवैध मार्गाने प्रवेश केला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नवी मुंबई युनिट यांची मदतीने कारवाई करण्याकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षक  धनंजय देवडीकर, रविंद्र उतेकर, तसेच पथकाने मतिन पटेल चाळ व अकिल पटेल चाळ, सेक्टर १२  ई, बोनकोड, खैरणे गाव, नवी मुंबई येथे धाड टाकली. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याची कबुलीही दिली. या सर्वांवर पारपत्र कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 