नवी मुंबईत डान्सबार वर पोलिसांची वक्र नजर पडली असून कारवाईत वाढ करण्यात येत आहे. शनिवार आणि रविवारी या दोन दिवसात तीन डान्स बार वर कारवाई करण्यात आली असून यात ५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : ‘नको असलेल्या वस्तू हवे असलेल्यांपर्यंत’ पोहचविण्यासाठीच्या संकल्पनेचे विद्रुपीकरण
नवी मुंबईत डान्स बार पुन्हा मूळ धरत आहे. हि बाब नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या समोर आल्यावर डान्सबार वरील कारवाईत वाढ झाली आहे. शनिवारी एनआरआय आणि तुर्भे तर रविवारी सीबीडी पोलीस ठाणे अंतर्गत बार वर धाड टाकण्यात आली. तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला कामगार (बारबाला) या तोकडे कपडे आणि अश्लील हवाभाग करून पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असताना आढळून आले. एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतील “आयकन द बार” यावर कारवाई करण्यात आली. हि कारवाई ७ तारखेला करण्यात आली.या ठिकाणी तब्बल २६ जणांवर कारवाई करण्यात आली आली. यात १६ महिला कामगार व १० अन्य कामगारांचा समावेश आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : मोकळ्या भूखंडावरील राडारोडा, कचऱ्याकडे महापालिकेडून दुर्लक्षित?
संजय सोरेन व्यवस्थापक, सचिनकुमार साव, पंकज कुमार केवट, कामगार व अन्य ग्राहकांचा समावेश आहे.सीबीडी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या सेक्टर ११ येथील मेघराज या बार वर धाड टाकण्यात आली. रात्री साडेअकरा पासून तीन तास चाललेल्या या कारवाईत २६ जणांवर कारवाई करण्यात आली यात १९ बारबाला, ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र ग्राहक केवळ पाच आढळून आली. तारेश शेट्टी व्यवस्थापक, त्यागराजन गोंदडापाणी रोखपाल, सुमित मेहता निरंजन थाकरू सानोज सिंग आकाश सिंग हे कामगार (वेटर) दुसर्याच दिवशी आठ तारखेला सानपाडा सेक्टर ५ येथील मयूर बारवर धाड टाकण्यात आली यात एकूण १७ जणांवर कारवाई करण्यात आली.यात नेमचंद शहा आणि राजेश पाणी हे कामगार (वेटर) आणि १५ महिला कामगारांचा (बारबाला) समावेश आहे.