नवी मुंबई : वाशी गाव जागृतेश्वर मंदिरामागील खाडीत अवैधरित्या कांदळवनाच्या जागेत खारफुटीची कत्तल करून त्याजागी अनधिकृत गोशाळा सुरू होती. त्यावर वन विभागाच्या वतीने कारवाई करून एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नवी मुंबईकरांनो सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार..

हेही वाचा – नवी मुंबई : एपीएमसीत कांद्याच्या दरात घसरण

नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा लाभला असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवन खारफुटी आहे. मात्र काही भूमाफियांकडून अशा खारफुटीवर डेब्रिज टाकून खारफुटीची सर्रास कत्तल केली जात आहे. तसेच डेब्रिज टाकल्यानंतर त्या ठिकाणी झोपड्या, अनधिकृत बांधकाम करून ते भाड्यावर देण्याचे प्रकार सुरू आहेत. अशाच प्रकारे वाशी गाव जागृतेश्वर मंदिरामागे २२७८ चौरस मीटर जागेतील कांदळवनावर डेब्रिजचा भराव टाकून त्या जागेवर एक गो शाळा बांधण्यात आली होती. यावर कांदळवन विभागाच्यावतीने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई करण्यात आली. तसेच विना परवाना कांदळवन नष्ट करून बांधकाम केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वन अधिकारी दीपक चव्हाण यांनी दिली.