नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे याविरोधात पुन्हा एकदा कारवाई सुरू झाली असून बुधवारी अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांचा मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभागात अनधिकृतरित्या विनापरवानगी बांधलेल्या अतिक्रमण बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रातील मे. वैदेश्वर डेव्हलपर्स (वैष्णवी इंटरप्रायजेस), शॉप नं १५,भूखंड क्र ७२,सेक्टर-५, कोपरखैरणे, मे. वैदेश्वर डेव्हलपर्स (मोनालीसा पॅलेस) शॉप नं १६, भूखंड क्र ७२,सेक्टर-५, कोपरखैरणे यांना पालिकेने नोटीस बजावली होती. त्या ठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतरित्या पोटमाळ्याचे बांधकाम केले होते.

आणखी वाचा-मोदींच्या आगमनापूर्वी उरण परिसरातील हवा शुद्ध

तथापि याबाबत संबंधितानी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहेत. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून त्यांच्यामार्फत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्त तसेच, १० मजूर, १ पिकअप व्हॅन, २ इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर १ इत्यादीचा वापर करण्यात आला आगामी काळात संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व आठही विभाग कार्यालय परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाया तीव्रतेने राबविल्या जाणार असल्याची माहिती कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील काठोळे यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on encroachments in koparkhairane by navi mumbai municipal corporation mrj
Show comments